Posts

Showing posts from December, 2020

Hawa Mahal ! A special palace of Rajput women in the royal family, Jaipur, Rajasthan (Built in 1799).

Image
राजघराण्यातील रजपूत स्त्रियांचा खासा हवामहल, जयपुर,राजस्थान ( बांधकाम इ.स. १७९९). राजस्थान म्हणजे भारतीय संस्कृती , स्थापत्यकला, खाद्यसंस्कृती आणि लोकसंस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. येथील कला, संस्कृती आणि येथे असणाऱ्या अनेक पुरातन वास्तू, राजमहाल आणि बागबगीचे म्हणजे पर्यटनासाठीचा मोठा खजिना आहे. राजस्थानच्या प्रत्येक शहरात, गावात आपल्याला अनेक महाल, वास्तू आजही खूप चांगल्या अवस्थेत दिसून येतात. राजस्थानची राजधानी असणाऱ्या जयपूर या गुलाबी शहरालाही असाच मोठा ऐतिहासिक वारसा आहे. येथील राजमहाल, किल्ले अतिशय सुंदर आहेत. त्यांच्या निर्मितीचा, तेथील वैभवाचा इतिहास जाणून घेणे अतिशय रंजक आहे.  राजस्थानचे गुलाबी शहर अशी ओळख असणाऱ्या जयपूरमधील बाडी चौपड याठिकाणी असणारा हवामहल (Hawa mahal) हा महाल म्हणजे राजपुतांचा शाही वारसा आहे. हा महाल म्हणजे  वास्तुकला आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ आहे. राजस्थानच्या सर्वात प्राचीन वास्तूंपैकी ही एक वास्तू आहे. पर्यटकांसाठीचे हे सर्वात मोठे आकर्षण आहे. या महालाला अनेक खिडक्या आणि झरोके असल्या...

Damadi Masjid, the wonder of architecture ! (Established, 1567, Ahmednagar)

Image
  कामगारांनी दमडी जमवून बांधलेली आणि स्थापत्यशास्त्राचा अदभुत नमुना असणारी अहमदनगरची  दमडी मशीद (स्थापना, इ.स. १५६७, अहमदनगर). आपल्या देशात अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमूना असनाऱ्या वास्तू आहेत. अनेक राजवाडे, महाल, मंदिर, मशिदी, कबरी, विविध लेणी या सगळ्यांचा त्यात समावेश आहे. या सगळ्याला एक इतिहास आहे. या वास्तुंच्या वैभव संपन्नतेच्या, त्या बांधण्यासाठी आलेल्या खर्चाच्या अनेक कहाण्या प्रचलित आहेत. मुघलकालीन वास्तूशैलीच्या खर्चा संबधाच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. मुघलांनी, निजामानी अनेक मशिदी, किल्ले आणि महाल बांधले. त्या प्रत्येकाच्या बांधकामाची, त्यासाठी वापरलेल्या संपत्ती विषयीच्या  बऱ्याच चर्चा आपण ऐकलेल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील   अहमदनगर   या शहरात निजामकालीन  काळात बांधण्यात आलेली एक अशी मशीद (Masjid) आहे, जी काही कामगारांनी मिळून एक एक दमडी  जमवून बांधली होती. आणि विशेष म्हणजे य...

क्रांतिकारक चापेकर बंधूं स्मारक, सन २००५ मध्ये स्थापित (पुणे, चिंचवड, महाराष्ट्र)

Image
Revolutionary  Chapekar Brothers Monument, established in year 2005 (Pune, Chinchawad, Maharashtra) पुणे शहराला जशी सांस्कृतिक ओळख आहे, तसेच हे शहर पारतंत्र्याच्याकाळात अनेक क्रांतिकारकांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या साहसी घटनांनी पुनीत झालेले म्हणूनही या शहराची ओळख सांगता येईल.  देशासाठी हौतात्म्य पत्क़रणाऱ्या चापेकर बंधूंच्या (Chapekar Brothers) वास्तव्याने पुनीत झालेला चापेकर वाडा म्हणजे अलौकिक अनुभव देणारी वास्तु आहे. इतिहासच्या पानातील हे एकमेव कुटुंब की,ज्या घरातील तीन मुले देशासाठी फ़ासावर गेली. अशा या महापुरुषांच्या आठवणींचे स्मरण करूण देणारा हा वाडा… Read more