राजघराण्यातील रजपूत स्त्रियांचा खासा हवामहल, जयपुर,राजस्थान ( बांधकाम इ.स. १७९९). राजस्थान म्हणजे भारतीय संस्कृती , स्थापत्यकला, खाद्यसंस्कृती आणि लोकसंस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. येथील कला, संस्कृती आणि येथे असणाऱ्या अनेक पुरातन वास्तू, राजमहाल आणि बागबगीचे म्हणजे पर्यटनासाठीचा मोठा खजिना आहे. राजस्थानच्या प्रत्येक शहरात, गावात आपल्याला अनेक महाल, वास्तू आजही खूप चांगल्या अवस्थेत दिसून येतात. राजस्थानची राजधानी असणाऱ्या जयपूर या गुलाबी शहरालाही असाच मोठा ऐतिहासिक वारसा आहे. येथील राजमहाल, किल्ले अतिशय सुंदर आहेत. त्यांच्या निर्मितीचा, तेथील वैभवाचा इतिहास जाणून घेणे अतिशय रंजक आहे. राजस्थानचे गुलाबी शहर अशी ओळख असणाऱ्या जयपूरमधील बाडी चौपड याठिकाणी असणारा हवामहल (Hawa mahal) हा महाल म्हणजे राजपुतांचा शाही वारसा आहे. हा महाल म्हणजे वास्तुकला आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ आहे. राजस्थानच्या सर्वात प्राचीन वास्तूंपैकी ही एक वास्तू आहे. पर्यटकांसाठीचे हे सर्वात मोठे आकर्षण आहे. या महालाला अनेक खिडक्या आणि झरोके असल्या...
Comments
Post a Comment