Posts

Residence of early revolutionary Vasudev Balwant Phadke – Nrusinha Temple, Sadashivpeth, Pune (1865 to 1879)

Image
आद्य क्रांतिवीर वासूदेव बळवंत फडक्यांच्या वास्तव्याचे ठिकाण  – नृसींह मंदिर, सदाशिवपेठ, पुणे (इ.स. १८६५ ते १८७९) पुणे  शहराच्या सदाशीव पेठेतील रस्त्यावरून जाताना एक वाडा सदृश  मंदिर  आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराच्या बाहेरच्या सज्जावर महापालिकेकडून पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती या उपक्रमाअंतर्गत  निळी गोल आकाराची पाटी लावलेली दिसते. त्यावरची अक्षरे आहेत, आद्य  क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके (Revolutionary Vasudev Balvanta Fadake )  येथे रहात होते. ( वास्तव्याचा काळ – इ.स. १८६५ ते १८७९) हे वाचून आपण आपली गाडी तेथे पार्क करून आपली पावले मंदिराकडे  वळवतो. शालेय पाठ्यपुस्तकात कधीतरी वाचलेल्या या महापुरूषाचे वास्तव्य या शांत मंदिरात होते हे ऐकून मंदिर आणि या परिसराविषयीची उत्सूकता निर्माण होते. धार्मिक आणि ऐतिहासिक असे दुहेरी महत्त्व असणाऱ्या या मंदिराला सुमारे अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. सुरूवातीला आपण या मंदिराच्या निर्मीतीचा इतिहास जाणून घेऊ. आणि त्यानंतर या पवित्र धार्मिक स्थळाला आपल्या वास्तव्याने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या वासूदेव बळवं...

Want to know the stages of human history and culture? So visit the Deccan College’s Archaeology Museum.

Image
  मानवी इतिहास आणि संस्कृतीचे टप्पे जाणून घ्यायचे आहेत ? तर भेट द्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व (Archaeology) संग्रहालयाला. पुणे शहरातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळं शहराच्या मध्यवर्तीभागात आहेत. शहराची जान असणाऱ्या पेठांमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक स्थळं,  संग्रहालय  आहेत, ज्यांना पुणे दर्शन करायला येणार्यांकडून वरचेवर भेट दिली जाते. मात्र काही महत्वाची पर्यटन स्थळ आहेत जी सध्याच्या शहराच्या झालेल्या विस्तारामुळे शहराच्या बाजूला पडल्या सारखी वाटतात. अशीच एक महत्त्वाची वास्तू आहे डेक्कन महाविद्यालयाच्या आवारात. विद्यार्थी, पालक आणि आपल्या संस्कृतीविषयी ज्यांना उत्सुकता आहे अशा सर्वांसाठी ही जागा फार महत्त्वाची आहे. या ठिकाणी असणारे पुरातत्व (Archaeology) विभागाचे पुरातत्व संग्रहालय आवर्जून भेट देण्यासारखे आहे. मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या विविध प्रगत अवस्था व संक्रमणाचे टप्पे दर्शवणारे पुण्यातील डेक्कन महाविद्यालयाचे हे पुरातत्त्व (Archaeology) संग्रहालय मानवी इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी मोठी पर्वणी आहे. Read More....

How to visit Museums? – India’s best Museums!

Image
  संग्रहालय कशी पहावीत ? भारतातील महत्त्वाची संग्रहालये (Museums)! संग्रहालयांची निर्मीती कशी झाली असेल, ती का निर्माण करावीशी वाटली असतील याचा जर विचार केला तर असे वाटते की,आपण जे ज्ञान प्राप्त केले आहे, ज्या काही कलाकृती निर्माण केल्या गेल्या असतील त्याचा प्रसार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानेच संग्रहालये निर्माण करण्यात आली असावीत. संग्रहालय (Museums) ही देशाची, शहराची …  Read more

Mahatma Gandhi Monuments (30 January 1948) – Rajghat, Delhi

Image
  महात्मा गांधी (Mahatma Gandhi) समाधी (३० जानेवारी १९४८)  – राज घाट, दिल्ली  ‘महात्मा गांधी’ (Mahatma Gandhi) हे नाव माहित नाही अशी व्यक्ती देशातच नाही तर संपूर्ण जगात सापडणे अवघड आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक आग्रणी नेते, जगाला अहिंसेचे महत्त्व आणि शिकवण देणारे असे ते आधुनिक संतच होते. अशा या महात्म्याची समाधी दिल्ली येथील राजघाटावर आहे. ही अशी …  Read more

Dnyaneshwari Pais Khamb (1290) Nevasa, Ahmednagar

Image
  ज्ञानेश्वरीचा (Dnyaneshwari) पैस खांब (इ.स. १२९०) – नेवासा, अहमदनगर संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील, पैठणमधील (Paithan) आपेगाव या ठिकाणी झाला. लहाणपण त्यांचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी (Devachi Alandi) याठिकाणी गेले. संन्यासी आई-वडिलांची मुले म्हणुन ज्ञोनोबा आणि त्यांची तीन भावंडांनी अनेक हालअपेष्टांचा सामना केला. अशाच एका प्रसंगी आपल्याला शुद्धीपत्र मिळावे यासाठी ही भावंडे पैठण येथे …  Read more

Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi -Sanjivan Samadhi , 1296 – Devechi Alandi, Pune.

Image
  ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर इ.स.१२९६ – देवाची आळंदी, पुणे. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. या भूमीत अनेक महान संत होऊन गेले. त्यातील एक म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज जे १२व्या शतकात होऊन गेले आणि त्यांच्या अल्पआयुष्यातील महत्त्वाचा काळ त्यांनी पुण्यातील देवाची आळंदी (Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi) येथे व्यतित केला. आज येथील ज्ञानेश्वर …  Read more

Mastani Memorial | A Good Place to visit once (1740 Pabal, Pune)

Image
अजरामर योद्धा बाजीराव पेशव्यांची पत्नी श्रीमंत मस्तानीबाईचे ( Mastani ) स्मृतीस्थळ – (मृत्यु १७४० पुणे,पाबळ ) मस्तानीबाई (Mastani) या पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या दुसरी पत्नी होत्या. त्यांच्या सौंदर्यांबरोबरच त्या शौर्यशक्तीसाठीही ओळखल्या जात.परंतु  परधर्मीय म्हणजे ‘प्रणामी पंथाच्या’ (Pranami Pantha) असल्यामुळे पुण्यातील कर्मठ समाजाने त्यांचा कधीही स्वीकार केला नाही. पुण्यातील समाजाने नाकारल्यामुळे शिरूरजवळील (Shirur ) पाबळ या ठिकाणी …  Read more