Want to know the stages of human history and culture? So visit the Deccan College’s Archaeology Museum.
मानवी इतिहास आणि संस्कृतीचे टप्पे जाणून घ्यायचे आहेत ? तर भेट द्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व (Archaeology) संग्रहालयाला.
पुणे शहरातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळं शहराच्या मध्यवर्तीभागात आहेत. शहराची जान असणाऱ्या पेठांमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक स्थळं, संग्रहालय आहेत, ज्यांना पुणे दर्शन करायला येणार्यांकडून वरचेवर भेट दिली जाते.
मात्र काही महत्वाची पर्यटन स्थळ आहेत जी सध्याच्या शहराच्या झालेल्या विस्तारामुळे शहराच्या बाजूला पडल्या सारखी वाटतात. अशीच एक महत्त्वाची वास्तू आहे डेक्कन महाविद्यालयाच्या आवारात. विद्यार्थी, पालक आणि आपल्या संस्कृतीविषयी ज्यांना उत्सुकता आहे अशा सर्वांसाठी ही जागा फार महत्त्वाची आहे. या ठिकाणी असणारे पुरातत्व (Archaeology) विभागाचे पुरातत्व संग्रहालय आवर्जून भेट देण्यासारखे आहे.
मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या विविध प्रगत अवस्था व संक्रमणाचे टप्पे दर्शवणारे पुण्यातील डेक्कन महाविद्यालयाचे हे पुरातत्त्व (Archaeology) संग्रहालय मानवी इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी मोठी पर्वणी आहे. Read More....

Comments
Post a Comment