Posts

World Heritage Site of Amer Fort in Jaipur (Built by King Mansingh in 16th Century)

Image
जागतिक वारसा असलेला जयपुरचा आमेर किल्ला ( (बांधकाम – राजा मानसिंहद्वारा इ.स.१६ व्या शतकात)   राजस्थान मधील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणजेच  जयपुरचा  आमेर किल्ला (Amer Fort). आमेर हे खरे पाहता एक शहर आहे जे राजधानी जयपुर पासुन 11 किमी अंतरावर आहे, येथील किल्ला म्हणजेच आमेर किल्ला. पर्यटक आमेर किल्ल्यास  विविध नावांनी ‌ओळखतात जसे ‘अंबर पॅलेस, आमेरचा किल्ला, आमेर का किला’ इत्यादी. हा किल्ला १६ व्या शतक़ात राजा मानसिंह यांच्याद्वारे बांधला गेला. या किल्ल्याचे नाव अंबा माता या नावावरून ठेवण्यात आले आहे. कारण याला अंबर किल्ला म्हणूनही ओळखले जाते... Read more

Unforgettable Jantar Mantar City of Astronomy, Jaipur (Period of Creation 1724 to 1734)

Image
  खगोलशास्त्राची अविस्मरणीय जंतर मंतर नगरी, जयपूर ( निर्मिती कालावधी इ.स. १७२४ ते १७३४ ) जंतर मंतर (Jantar Mantar) हा शब्द एकला की एक तर आपल्याला काहीतरी जादू आठवते किंवा लहानमुलांशी निगडित एखादा खेळ. मात्र जयपूर मधील शहरात जंतरमंतर (Jantar Mantar) हा शब्द जोडला गेला आहे तो येथील एका जगत्मान्य वास्तूशी, जिचे स्वरूप आणि काम बघून आपण थक्क होतो. येथील जंतर मंतर (Jantar Mantar) म्हणजे काही जादूचे खेळ नाही, तर ही आहे एक खगोल शास्त्राची वेधशाळा. मात्र या वेध शाळेच्या निर्मितीचा काळ, त्याची भव्यता आणि आजचे तिचे स्वरूप बघितले की खरच असे वाटते की किती मोठ्या ज्ञानाची साठवणूक याठिकाणी करून ठेवण्यात आलेली आहे.  आज अनेक यंत्र, संगणक अनेक सोयीसुविधा निर्माण झालेल्या आहेत. विज्ञानाने आज खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. परंतु ही वेधशाळा पाहून समजते की, त्याकाळी अवकाशाचा वेध  घेण्यासाठी, त्याच्या अंतरंगातील विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी किती अभ्यास करून, कष्ट घेऊन हे सर्व उभारले असेल.... Read more

Hawa Mahal ! A special palace of Rajput women in the royal family, Jaipur, Rajasthan (Built in 1799).

Image
राजघराण्यातील रजपूत स्त्रियांचा खासा हवामहल, जयपुर,राजस्थान ( बांधकाम इ.स. १७९९). राजस्थान म्हणजे भारतीय संस्कृती , स्थापत्यकला, खाद्यसंस्कृती आणि लोकसंस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. येथील कला, संस्कृती आणि येथे असणाऱ्या अनेक पुरातन वास्तू, राजमहाल आणि बागबगीचे म्हणजे पर्यटनासाठीचा मोठा खजिना आहे. राजस्थानच्या प्रत्येक शहरात, गावात आपल्याला अनेक महाल, वास्तू आजही खूप चांगल्या अवस्थेत दिसून येतात. राजस्थानची राजधानी असणाऱ्या जयपूर या गुलाबी शहरालाही असाच मोठा ऐतिहासिक वारसा आहे. येथील राजमहाल, किल्ले अतिशय सुंदर आहेत. त्यांच्या निर्मितीचा, तेथील वैभवाचा इतिहास जाणून घेणे अतिशय रंजक आहे.  राजस्थानचे गुलाबी शहर अशी ओळख असणाऱ्या जयपूरमधील बाडी चौपड याठिकाणी असणारा हवामहल (Hawa mahal) हा महाल म्हणजे राजपुतांचा शाही वारसा आहे. हा महाल म्हणजे  वास्तुकला आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ आहे. राजस्थानच्या सर्वात प्राचीन वास्तूंपैकी ही एक वास्तू आहे. पर्यटकांसाठीचे हे सर्वात मोठे आकर्षण आहे. या महालाला अनेक खिडक्या आणि झरोके असल्या...

Damadi Masjid, the wonder of architecture ! (Established, 1567, Ahmednagar)

Image
  कामगारांनी दमडी जमवून बांधलेली आणि स्थापत्यशास्त्राचा अदभुत नमुना असणारी अहमदनगरची  दमडी मशीद (स्थापना, इ.स. १५६७, अहमदनगर). आपल्या देशात अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमूना असनाऱ्या वास्तू आहेत. अनेक राजवाडे, महाल, मंदिर, मशिदी, कबरी, विविध लेणी या सगळ्यांचा त्यात समावेश आहे. या सगळ्याला एक इतिहास आहे. या वास्तुंच्या वैभव संपन्नतेच्या, त्या बांधण्यासाठी आलेल्या खर्चाच्या अनेक कहाण्या प्रचलित आहेत. मुघलकालीन वास्तूशैलीच्या खर्चा संबधाच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. मुघलांनी, निजामानी अनेक मशिदी, किल्ले आणि महाल बांधले. त्या प्रत्येकाच्या बांधकामाची, त्यासाठी वापरलेल्या संपत्ती विषयीच्या  बऱ्याच चर्चा आपण ऐकलेल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील   अहमदनगर   या शहरात निजामकालीन  काळात बांधण्यात आलेली एक अशी मशीद (Masjid) आहे, जी काही कामगारांनी मिळून एक एक दमडी  जमवून बांधली होती. आणि विशेष म्हणजे य...

क्रांतिकारक चापेकर बंधूं स्मारक, सन २००५ मध्ये स्थापित (पुणे, चिंचवड, महाराष्ट्र)

Image
Revolutionary  Chapekar Brothers Monument, established in year 2005 (Pune, Chinchawad, Maharashtra) पुणे शहराला जशी सांस्कृतिक ओळख आहे, तसेच हे शहर पारतंत्र्याच्याकाळात अनेक क्रांतिकारकांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या साहसी घटनांनी पुनीत झालेले म्हणूनही या शहराची ओळख सांगता येईल.  देशासाठी हौतात्म्य पत्क़रणाऱ्या चापेकर बंधूंच्या (Chapekar Brothers) वास्तव्याने पुनीत झालेला चापेकर वाडा म्हणजे अलौकिक अनुभव देणारी वास्तु आहे. इतिहासच्या पानातील हे एकमेव कुटुंब की,ज्या घरातील तीन मुले देशासाठी फ़ासावर गेली. अशा या महापुरुषांच्या आठवणींचे स्मरण करूण देणारा हा वाडा… Read more

Residence of early revolutionary Vasudev Balwant Phadke – Nrusinha Temple, Sadashivpeth, Pune (1865 to 1879)

Image
आद्य क्रांतिवीर वासूदेव बळवंत फडक्यांच्या वास्तव्याचे ठिकाण  – नृसींह मंदिर, सदाशिवपेठ, पुणे (इ.स. १८६५ ते १८७९) पुणे  शहराच्या सदाशीव पेठेतील रस्त्यावरून जाताना एक वाडा सदृश  मंदिर  आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराच्या बाहेरच्या सज्जावर महापालिकेकडून पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती या उपक्रमाअंतर्गत  निळी गोल आकाराची पाटी लावलेली दिसते. त्यावरची अक्षरे आहेत, आद्य  क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके (Revolutionary Vasudev Balvanta Fadake )  येथे रहात होते. ( वास्तव्याचा काळ – इ.स. १८६५ ते १८७९) हे वाचून आपण आपली गाडी तेथे पार्क करून आपली पावले मंदिराकडे  वळवतो. शालेय पाठ्यपुस्तकात कधीतरी वाचलेल्या या महापुरूषाचे वास्तव्य या शांत मंदिरात होते हे ऐकून मंदिर आणि या परिसराविषयीची उत्सूकता निर्माण होते. धार्मिक आणि ऐतिहासिक असे दुहेरी महत्त्व असणाऱ्या या मंदिराला सुमारे अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. सुरूवातीला आपण या मंदिराच्या निर्मीतीचा इतिहास जाणून घेऊ. आणि त्यानंतर या पवित्र धार्मिक स्थळाला आपल्या वास्तव्याने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या वासूदेव बळवं...

Want to know the stages of human history and culture? So visit the Deccan College’s Archaeology Museum.

Image
  मानवी इतिहास आणि संस्कृतीचे टप्पे जाणून घ्यायचे आहेत ? तर भेट द्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व (Archaeology) संग्रहालयाला. पुणे शहरातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळं शहराच्या मध्यवर्तीभागात आहेत. शहराची जान असणाऱ्या पेठांमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक स्थळं,  संग्रहालय  आहेत, ज्यांना पुणे दर्शन करायला येणार्यांकडून वरचेवर भेट दिली जाते. मात्र काही महत्वाची पर्यटन स्थळ आहेत जी सध्याच्या शहराच्या झालेल्या विस्तारामुळे शहराच्या बाजूला पडल्या सारखी वाटतात. अशीच एक महत्त्वाची वास्तू आहे डेक्कन महाविद्यालयाच्या आवारात. विद्यार्थी, पालक आणि आपल्या संस्कृतीविषयी ज्यांना उत्सुकता आहे अशा सर्वांसाठी ही जागा फार महत्त्वाची आहे. या ठिकाणी असणारे पुरातत्व (Archaeology) विभागाचे पुरातत्व संग्रहालय आवर्जून भेट देण्यासारखे आहे. मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या विविध प्रगत अवस्था व संक्रमणाचे टप्पे दर्शवणारे पुण्यातील डेक्कन महाविद्यालयाचे हे पुरातत्त्व (Archaeology) संग्रहालय मानवी इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी मोठी पर्वणी आहे. Read More....