Posts

भूसर्वेक्षणाचा शून्य मैल दगड, नागपूर (स्थापना – इ.स. १९०७).

Image
  Nagpur’s Zero Mile Stone of Land Survey देशाची उपराजधानी तसेच ऑरेंजसीटी हीच  नागपुर  (Nagpur) शहराची ओळख जनसामान्यांमधे प्रचलित आहे. मात्र याच शहराची सुमारे सव्वाशे वर्षांपासून आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे देशाचा केंद्रबिंदू. भौगिलीक दृष्ट्या हे शहर देशाच्या मध्यभागी असणारे शहर म्हणून प्रचलित आहे. देशाचा केंद्रबींदू ही ओळख  ब्रिटीशकालीन भारतात या शहराला  देण्यात आली होती. त्याचे प्रतिक म्हणून शून्य मैलाचा दगड (zero mile stone ) या शहरात दिमाखाने उभा आहे. हा दगड आणि त्याच्या प्रतिकात्मक स्तंभाची उभारणी इ.स. १९०७ मध्ये करण्यात आलेली आहे... Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पवित्र दीक्षा भूमी (Deekshabhoomi) ( नागपूर,१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ )

Image
नागपूर  शहर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी. ‘ऑरेंज सिटी’ अशी या शहराची ओळख. एक निवांत, ऐसपैस शहर, जिथे आपण शांततेने, मनसोक्त हिंडूण्याचा आनंद घेऊ शकतो. इथल्या खास नागपुरी तिखट पदार्थांचा आणि संत्राबर्फीचा आस्वाद घेत आपण येथील अनेक पर्यटनस्थळ फिरतो. मोठे शहर असूनही या शहराने  जो एक निवांतपणा जपला आहे त्याला खरच तोड नाही. नागपूर शहर फिरण्याचे  माझे अनेक  कारणं  होते , त्यातील महत्वाच मुख्य कारण होतं ते येथील दीक्षा भूमीला (Deekshabhoomi) भेट देण्याचं... Read more

World Heritage Site of Amer Fort in Jaipur (Built by King Mansingh in 16th Century)

Image
जागतिक वारसा असलेला जयपुरचा आमेर किल्ला ( (बांधकाम – राजा मानसिंहद्वारा इ.स.१६ व्या शतकात)   राजस्थान मधील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणजेच  जयपुरचा  आमेर किल्ला (Amer Fort). आमेर हे खरे पाहता एक शहर आहे जे राजधानी जयपुर पासुन 11 किमी अंतरावर आहे, येथील किल्ला म्हणजेच आमेर किल्ला. पर्यटक आमेर किल्ल्यास  विविध नावांनी ‌ओळखतात जसे ‘अंबर पॅलेस, आमेरचा किल्ला, आमेर का किला’ इत्यादी. हा किल्ला १६ व्या शतक़ात राजा मानसिंह यांच्याद्वारे बांधला गेला. या किल्ल्याचे नाव अंबा माता या नावावरून ठेवण्यात आले आहे. कारण याला अंबर किल्ला म्हणूनही ओळखले जाते... Read more

Unforgettable Jantar Mantar City of Astronomy, Jaipur (Period of Creation 1724 to 1734)

Image
  खगोलशास्त्राची अविस्मरणीय जंतर मंतर नगरी, जयपूर ( निर्मिती कालावधी इ.स. १७२४ ते १७३४ ) जंतर मंतर (Jantar Mantar) हा शब्द एकला की एक तर आपल्याला काहीतरी जादू आठवते किंवा लहानमुलांशी निगडित एखादा खेळ. मात्र जयपूर मधील शहरात जंतरमंतर (Jantar Mantar) हा शब्द जोडला गेला आहे तो येथील एका जगत्मान्य वास्तूशी, जिचे स्वरूप आणि काम बघून आपण थक्क होतो. येथील जंतर मंतर (Jantar Mantar) म्हणजे काही जादूचे खेळ नाही, तर ही आहे एक खगोल शास्त्राची वेधशाळा. मात्र या वेध शाळेच्या निर्मितीचा काळ, त्याची भव्यता आणि आजचे तिचे स्वरूप बघितले की खरच असे वाटते की किती मोठ्या ज्ञानाची साठवणूक याठिकाणी करून ठेवण्यात आलेली आहे.  आज अनेक यंत्र, संगणक अनेक सोयीसुविधा निर्माण झालेल्या आहेत. विज्ञानाने आज खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. परंतु ही वेधशाळा पाहून समजते की, त्याकाळी अवकाशाचा वेध  घेण्यासाठी, त्याच्या अंतरंगातील विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी किती अभ्यास करून, कष्ट घेऊन हे सर्व उभारले असेल.... Read more

Hawa Mahal ! A special palace of Rajput women in the royal family, Jaipur, Rajasthan (Built in 1799).

Image
राजघराण्यातील रजपूत स्त्रियांचा खासा हवामहल, जयपुर,राजस्थान ( बांधकाम इ.स. १७९९). राजस्थान म्हणजे भारतीय संस्कृती , स्थापत्यकला, खाद्यसंस्कृती आणि लोकसंस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. येथील कला, संस्कृती आणि येथे असणाऱ्या अनेक पुरातन वास्तू, राजमहाल आणि बागबगीचे म्हणजे पर्यटनासाठीचा मोठा खजिना आहे. राजस्थानच्या प्रत्येक शहरात, गावात आपल्याला अनेक महाल, वास्तू आजही खूप चांगल्या अवस्थेत दिसून येतात. राजस्थानची राजधानी असणाऱ्या जयपूर या गुलाबी शहरालाही असाच मोठा ऐतिहासिक वारसा आहे. येथील राजमहाल, किल्ले अतिशय सुंदर आहेत. त्यांच्या निर्मितीचा, तेथील वैभवाचा इतिहास जाणून घेणे अतिशय रंजक आहे.  राजस्थानचे गुलाबी शहर अशी ओळख असणाऱ्या जयपूरमधील बाडी चौपड याठिकाणी असणारा हवामहल (Hawa mahal) हा महाल म्हणजे राजपुतांचा शाही वारसा आहे. हा महाल म्हणजे  वास्तुकला आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ आहे. राजस्थानच्या सर्वात प्राचीन वास्तूंपैकी ही एक वास्तू आहे. पर्यटकांसाठीचे हे सर्वात मोठे आकर्षण आहे. या महालाला अनेक खिडक्या आणि झरोके असल्या...

Damadi Masjid, the wonder of architecture ! (Established, 1567, Ahmednagar)

Image
  कामगारांनी दमडी जमवून बांधलेली आणि स्थापत्यशास्त्राचा अदभुत नमुना असणारी अहमदनगरची  दमडी मशीद (स्थापना, इ.स. १५६७, अहमदनगर). आपल्या देशात अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमूना असनाऱ्या वास्तू आहेत. अनेक राजवाडे, महाल, मंदिर, मशिदी, कबरी, विविध लेणी या सगळ्यांचा त्यात समावेश आहे. या सगळ्याला एक इतिहास आहे. या वास्तुंच्या वैभव संपन्नतेच्या, त्या बांधण्यासाठी आलेल्या खर्चाच्या अनेक कहाण्या प्रचलित आहेत. मुघलकालीन वास्तूशैलीच्या खर्चा संबधाच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. मुघलांनी, निजामानी अनेक मशिदी, किल्ले आणि महाल बांधले. त्या प्रत्येकाच्या बांधकामाची, त्यासाठी वापरलेल्या संपत्ती विषयीच्या  बऱ्याच चर्चा आपण ऐकलेल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील   अहमदनगर   या शहरात निजामकालीन  काळात बांधण्यात आलेली एक अशी मशीद (Masjid) आहे, जी काही कामगारांनी मिळून एक एक दमडी  जमवून बांधली होती. आणि विशेष म्हणजे य...

क्रांतिकारक चापेकर बंधूं स्मारक, सन २००५ मध्ये स्थापित (पुणे, चिंचवड, महाराष्ट्र)

Image
Revolutionary  Chapekar Brothers Monument, established in year 2005 (Pune, Chinchawad, Maharashtra) पुणे शहराला जशी सांस्कृतिक ओळख आहे, तसेच हे शहर पारतंत्र्याच्याकाळात अनेक क्रांतिकारकांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या साहसी घटनांनी पुनीत झालेले म्हणूनही या शहराची ओळख सांगता येईल.  देशासाठी हौतात्म्य पत्क़रणाऱ्या चापेकर बंधूंच्या (Chapekar Brothers) वास्तव्याने पुनीत झालेला चापेकर वाडा म्हणजे अलौकिक अनुभव देणारी वास्तु आहे. इतिहासच्या पानातील हे एकमेव कुटुंब की,ज्या घरातील तीन मुले देशासाठी फ़ासावर गेली. अशा या महापुरुषांच्या आठवणींचे स्मरण करूण देणारा हा वाडा… Read more

Residence of early revolutionary Vasudev Balwant Phadke – Nrusinha Temple, Sadashivpeth, Pune (1865 to 1879)

Image
आद्य क्रांतिवीर वासूदेव बळवंत फडक्यांच्या वास्तव्याचे ठिकाण  – नृसींह मंदिर, सदाशिवपेठ, पुणे (इ.स. १८६५ ते १८७९) पुणे  शहराच्या सदाशीव पेठेतील रस्त्यावरून जाताना एक वाडा सदृश  मंदिर  आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराच्या बाहेरच्या सज्जावर महापालिकेकडून पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती या उपक्रमाअंतर्गत  निळी गोल आकाराची पाटी लावलेली दिसते. त्यावरची अक्षरे आहेत, आद्य  क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके (Revolutionary Vasudev Balvanta Fadake )  येथे रहात होते. ( वास्तव्याचा काळ – इ.स. १८६५ ते १८७९) हे वाचून आपण आपली गाडी तेथे पार्क करून आपली पावले मंदिराकडे  वळवतो. शालेय पाठ्यपुस्तकात कधीतरी वाचलेल्या या महापुरूषाचे वास्तव्य या शांत मंदिरात होते हे ऐकून मंदिर आणि या परिसराविषयीची उत्सूकता निर्माण होते. धार्मिक आणि ऐतिहासिक असे दुहेरी महत्त्व असणाऱ्या या मंदिराला सुमारे अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. सुरूवातीला आपण या मंदिराच्या निर्मीतीचा इतिहास जाणून घेऊ. आणि त्यानंतर या पवित्र धार्मिक स्थळाला आपल्या वास्तव्याने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या वासूदेव बळवं...

Want to know the stages of human history and culture? So visit the Deccan College’s Archaeology Museum.

Image
  मानवी इतिहास आणि संस्कृतीचे टप्पे जाणून घ्यायचे आहेत ? तर भेट द्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व (Archaeology) संग्रहालयाला. पुणे शहरातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळं शहराच्या मध्यवर्तीभागात आहेत. शहराची जान असणाऱ्या पेठांमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक स्थळं,  संग्रहालय  आहेत, ज्यांना पुणे दर्शन करायला येणार्यांकडून वरचेवर भेट दिली जाते. मात्र काही महत्वाची पर्यटन स्थळ आहेत जी सध्याच्या शहराच्या झालेल्या विस्तारामुळे शहराच्या बाजूला पडल्या सारखी वाटतात. अशीच एक महत्त्वाची वास्तू आहे डेक्कन महाविद्यालयाच्या आवारात. विद्यार्थी, पालक आणि आपल्या संस्कृतीविषयी ज्यांना उत्सुकता आहे अशा सर्वांसाठी ही जागा फार महत्त्वाची आहे. या ठिकाणी असणारे पुरातत्व (Archaeology) विभागाचे पुरातत्व संग्रहालय आवर्जून भेट देण्यासारखे आहे. मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या विविध प्रगत अवस्था व संक्रमणाचे टप्पे दर्शवणारे पुण्यातील डेक्कन महाविद्यालयाचे हे पुरातत्त्व (Archaeology) संग्रहालय मानवी इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी मोठी पर्वणी आहे. Read More....

How to visit Museums? – India’s best Museums!

Image
  संग्रहालय कशी पहावीत ? भारतातील महत्त्वाची संग्रहालये (Museums)! संग्रहालयांची निर्मीती कशी झाली असेल, ती का निर्माण करावीशी वाटली असतील याचा जर विचार केला तर असे वाटते की,आपण जे ज्ञान प्राप्त केले आहे, ज्या काही कलाकृती निर्माण केल्या गेल्या असतील त्याचा प्रसार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानेच संग्रहालये निर्माण करण्यात आली असावीत. संग्रहालय (Museums) ही देशाची, शहराची …  Read more

Mahatma Gandhi Monuments (30 January 1948) – Rajghat, Delhi

Image
  महात्मा गांधी (Mahatma Gandhi) समाधी (३० जानेवारी १९४८)  – राज घाट, दिल्ली  ‘महात्मा गांधी’ (Mahatma Gandhi) हे नाव माहित नाही अशी व्यक्ती देशातच नाही तर संपूर्ण जगात सापडणे अवघड आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक आग्रणी नेते, जगाला अहिंसेचे महत्त्व आणि शिकवण देणारे असे ते आधुनिक संतच होते. अशा या महात्म्याची समाधी दिल्ली येथील राजघाटावर आहे. ही अशी …  Read more

Dnyaneshwari Pais Khamb (1290) Nevasa, Ahmednagar

Image
  ज्ञानेश्वरीचा (Dnyaneshwari) पैस खांब (इ.स. १२९०) – नेवासा, अहमदनगर संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील, पैठणमधील (Paithan) आपेगाव या ठिकाणी झाला. लहाणपण त्यांचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी (Devachi Alandi) याठिकाणी गेले. संन्यासी आई-वडिलांची मुले म्हणुन ज्ञोनोबा आणि त्यांची तीन भावंडांनी अनेक हालअपेष्टांचा सामना केला. अशाच एका प्रसंगी आपल्याला शुद्धीपत्र मिळावे यासाठी ही भावंडे पैठण येथे …  Read more

Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi -Sanjivan Samadhi , 1296 – Devechi Alandi, Pune.

Image
  ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर इ.स.१२९६ – देवाची आळंदी, पुणे. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. या भूमीत अनेक महान संत होऊन गेले. त्यातील एक म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज जे १२व्या शतकात होऊन गेले आणि त्यांच्या अल्पआयुष्यातील महत्त्वाचा काळ त्यांनी पुण्यातील देवाची आळंदी (Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi) येथे व्यतित केला. आज येथील ज्ञानेश्वर …  Read more

Mastani Memorial | A Good Place to visit once (1740 Pabal, Pune)

Image
अजरामर योद्धा बाजीराव पेशव्यांची पत्नी श्रीमंत मस्तानीबाईचे ( Mastani ) स्मृतीस्थळ – (मृत्यु १७४० पुणे,पाबळ ) मस्तानीबाई (Mastani) या पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या दुसरी पत्नी होत्या. त्यांच्या सौंदर्यांबरोबरच त्या शौर्यशक्तीसाठीही ओळखल्या जात.परंतु  परधर्मीय म्हणजे ‘प्रणामी पंथाच्या’ (Pranami Pantha) असल्यामुळे पुण्यातील कर्मठ समाजाने त्यांचा कधीही स्वीकार केला नाही. पुण्यातील समाजाने नाकारल्यामुळे शिरूरजवळील (Shirur ) पाबळ या ठिकाणी …  Read more

Protected Monument – Bhuleshwar Shiv Mandir | संरक्षित स्मारक -भुलेश्वर शिवमंदिर.

Image
भुलेश्वर शिवमंदिर (Protected Monument) एका भेटीत ‘भुल’ पाडणारे असे आहे ‘भुलेश्वर मंदिर (Protected Monument – Bhuleshwar Shiv Temple) .’ तेराव्या शतकात बांधलेले हे शिवाचे मंदिर एका उंच टेकडीवर आहे. पुण्यापासून ४५ किलोमीटर तर पुणे-सोलापुर मार्गावरून १० किलोमीटरवर हे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून हे ‘इस्लामी’ बांधकाम शैलीचे असून, आतून मात्र ते हिंदू शैलीचे …  Read more

Aaga Khan Palace – Mahatma Gandhi National Monument

Image
आगाखान पॅलेस – महात्मा गांधी (Mahatma Gandhi) राष्ट्रीय स्मारक. महाराष्ट्रातील पुणे शहरात असताना जर तुमच्याकडे एक दिवसाचा वेळ आहे आणि फार लांब न जाता तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी, ऐतिहासिक ठेव्यासह निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायची इच्छा असेल तर तुम्ही पुणे-नगर रस्त्यालगत असणाऱ्या आगाखान पॅलेसला नक्कीच भेट द्यायला हवी. पुण्यातील आगाखान पॅलेस (Aagakhan Palace) हे ठिकाण ‘महात्मा …   Read more

Murud Janjira Fort – मुरूड जंजिरा किल्ला

Image
मुरूड जंजिरा हा किल्ला जलदुर्ग आहे. कायम अजिंक्य राहिलेला असा हा किल्ला आहे. या किल्ल्याचा इतिहास, याचे वास्तूवैशिष्ट्य आणि या किल्ल्याच्या सत्ताधिशांविषयीची माहिती मोठी रंजक आहे. ३३० वर्षे अजिंक्य राहिलेल्या या किल्ल्याचे अस्तित्व आजही टिकून आहे. महाराष्ट्रात कुठे आहे हा किल्ला (Murud Janjira)–  रायगड (Raygad) जिल्ह्यातील ‘मुरूड-जजिंरा’ हा एक अभेद्य किल्ला आहे.  चारी बाजूंनी अरबी …  Read more

Pune Archives Department

Image
पुणे पुरालेखागार – Pune Archives ‘पुणे पुरालेखागार’ (Pune Archives) विभाग म्हणजे मराठा व पेशवेकालीन कागदपत्रांच्या जतनातून इतिहास जिवंत ठेवणारी अशी ही इमारत होय. पुणे पुरालेखागार पुणे हा विभाग पूर्वी ‘पेशवे दफ्तर’ म्हणूनही ओळखला जात असे. या इमारतीला सव्वाशे वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. दिनांक १ सप्टेंबर १८९१ रोजी ही इमारत बांधून पूर्ण झाली आहे. प्रदिर्घ …  Read more

Mahadji Shinde chatri, Wanvadi, Pune.

Image
महादजी (Mahadji Shinde) शिंदे छत्री – महादजी शिंदे (Mahadji Shinde) छत्री हे ठिकाण एका थोर लढवय्या सेनापतींचे चिरविश्रांतीचे स्थान आहे. महादजी शिंदे हे पेशव्यांच्या सैन्याचे शूर सेनापती होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर (Panipat war)  मराठा साम्राज्याची विसकटलेली घडी परत बसवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पुढील काळात त्यांच्या अतुलनीय शौर्याने मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. अशा शूर योद्ध्याचे …  Read more

श्री त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवारपेठ, पुणे (Shree Trishund Ganapati Temple)

Image
पुण्यात अनेक पेशवेकालीन  एतिहासिक वास्तूंचे उत्तम नमुने आजही चांगल्या अवस्थेत आहेत. मात्र शनिवारवाडा, पर्वती, आगाखान पॅलेस अशा मोजक्याच वारसास्थळांची लोकांना माहिती असते. जरा आवडीने भटकंती केली की प्रत्येक शहरात फार प्रसिद्ध नसणाऱ्या मात्र तरीही अलौकिक अशा अनेक वास्तू, मंदिरे सापडतात. शासन आणि स्थानिक नागरिक यांच्या उदासिनतेमुळे अशी वारसास्थळं खरं तर प्रसिद्धीस येत नाहीत. हे त्या …  Read more